Virgin mojito | वर्जिन मोईतो
साहित्य:
पुदिना, लिंबाच्या फोडी, काळे मीठ, पिठीसाखर, बर्फ, स्प्राइट/साधा सोडा वॉटर
कृती:
१. प्रथम पुदिना आणि लिंबाच्या फोडी एका खलबत्त्यात घेऊन थोड्या क्रश करून घ्याव्यात.
२. नंतर एक ग्लासमध्ये चवीपुरते काळे मीठ आणि पिठीसाखर टाकावी. त्यात क्रश केलेले पुदिना आणि लिंबाचे मिश्रण घालावे.
आणि वरतून थंड सोडा वॉटर आणि बर्फ टाकून सर्व्ह करावे.
अशाप्रकारे आपले वर्जिन मोईतो तयार!