वेब सिरीज बघताना समजल…
१) आपण सोडून सगळे आपापल्या कामात बिझी आहेत, कोणीही उगाच सोशल मीडिया वर टाईमपास करत नाही..
२) चेन चोरी करणारा पण भिंतीवर नकाशा काढून रात्रभर प्लॅन करतो. आम्ही गोव्याला पोचल्यावर वर ‘ राहायला ‘ रूम शोधतो
३) एक दीड क्विंटल चा गुंड पण ८-९ किलोमिटर आरामात पळतो. आम्ही सोफ्याहून उतरल तरी घाम येतोय.
४) चोराला पायावर गोळी लागली तरी तो मरू शकतो पण हिरोला कपाळात लागली तरी तो कोमात जातो. आम्ही मोरीत पडलो तरी डावा हात आणि उजवा पाय प्लास्टर करतो.
५) जवळपास सगळ्या हुशार पोलिसांचे घटस्फोट होत आलेत. कारण त्यांच्याकडे वेळ नसतो.
६) हिरो नेहमी गाडीच्या पुढच्या डाव्या बाजूलाच बसतो.
७) कुर्ता चष्मा मिशी आणि कापडी पिशवी असलेला व्यक्ती खबरी किंवा लेखक असतो.
८) भंगारात भंगार चोराच्या घरी पण डायनिंग टेबल असतो.
९) हिरोच्या घरची लहान मुल एवढी चांगली असतात की ‘ बेटा कमरेमे जाव ‘ म्हटलं की ते ‘ ओके पापा ‘ म्हणतात, आमच्याकडे नाकात बोट घालून ते आपल्याकडे बघत बसत.
१०) सिरीज मध्ये मराठी कलाकार असतील तर ते एकतर कॉमेडी करणार किंवा घरकाम.
११) ९८% टक्के भुरटे चोर टपरीवर चहा पीत असताना पोलीस येतात आणि ते अर्धा चहा टाकून पळतात.
१२) चष्मा घातलेला फॉर्मल कपडे घातलेला गोरा कमी बोलणारा माणूसच मास्टरमाईंड असतो.
१३) जिथं अजाण सुरू आहे तिथं १००% पाठलाग सुरू असणार.
१४) वेबसिरीज मधल एक पण गान कोणाच्याच लक्षात नाहीये.
मनोज शिंगुस्ते…
( लेखक आताच सोफ्यावरून खाली उतरलेत )