वॉटरमेलन मोईतो मॉकटेल

By Snehal's Kitchen Corner Foods Recipe 1 Min Read
watermelon-mojito-mocktail

वॉटरमेलन मोईतो मॉकटेल

साहित्य:

कलिंगड, साधा सोडा वॉटर, मीठ, साखर, पुदीना, बर्फ

कृती:
१. प्रथम कलिंगडाचे काप, पुदिना ६-७ पान, ५-६ बर्फाचे क्युबस्, मीठ, साखर मिक्सर मधून काढून त्याचा ज्युस करून घ्यावा. नंतर तो गाळणीने गळून घ्यावा.

२. एक काचेच्या ग्लास घ्यावा. अर्धा ग्लास भरेपर्यंत त्यात कलिंगडाचा ज्यूस घालावा. नंतर एक तृतीयांश सोडा वॉटर घालावे.

३. १-२ पुदिना पाने घालून बर्फाचे २-३ क्युबस् घालून थंडगार सर्व्ह करावे.

अशाप्रकारे वॉटरमेलन मोईतो मॉकटेल तयार!

वेळ: अर्धा तास

Leave a comment