पावसाळा…!

By Team Bhampak Articles Entertainment Travel 2 Min Read
bhampak post

पावसाळा…!

पावसाळा म्हणजे एक वेगळीच गंमत. धो धो कोसळणारा पाऊस सोबत खूप साऱ्या आठवणी घेऊन येतो. वारा जरी सुसाट असला तरी मनाला एक अलगद वेगळीच चाहूल देतो. पावसाळा आला की आठवतात ते मित्रान बरोबर घालवलेले दिवस. पाऊस पडला की लगेच मेसेजेस यायला सूर्वात व्हायची. चला रे मस्त फिरायला जाऊया. मग काय लगेच गाड्या काध्याच्या आणि निघायचं. रस्त्याने लोकांच्या अंगावर पाणी उडवायच आणि त्याबद्दल त्यांना सॉरी न म्हणता त्यांच्यावर हसत पुढे निघून जायचं. ती मस्ती तो माज काही वेगळाच होता.

एका शांत ठिकाणी जायचं. चहा ची टपरी सगळी कडे असतेच. मग काय एक चहा एक सिगारेट. हातात चहा आणि दुसऱ्या हातात एक सिगारेट आणि वरून कोसळणारा पाऊस. ती मजाच वेगळी. मग काय तिथेच वडा पाव मिळाला तर अजुनच उत्तम नाहीतर तिकडून जायचं वडापाव कांदा भजी खायला. खरं राव पावसात वडापाव आणि कांदा भजी च सुखच काहीतरी वेगळं असतं. असं करत पावसात भिजून घरी यायचं आणि दुसऱ्या दिवशीच्या पावसाची वाट बघायची हा काय तो दिनक्रम.

पण आता पाऊस पडला की एक काळजी राहते बाबा सकाळी ऑफिस च्या वेळेत पडू नकोस. आजही चहा सिगारेट, वडापाव कांदा भजी मिळतात पण मित्रांन बरोबर फिरून मज्जा करायची याचं सुखच काहीतरी वेगळं. तुमच्या पावसातल्या गमती किंवा किस्से आम्हाला कळवा आणि आम्ही ते सगळ्यांपर्यंत पोहोचवु. पावसाळा आलाय भरपूर फिरा मज्जा करा आणि गाड्या हळू चालवा.

Leave a comment