महिलांविरुद्ध गुन्हेगारी यात तरुणांचा सहभाग
नमस्कार , बोलायची इच्छा मनात आली पण नेमका कोणता विषय घेऊ हे लक्षात येत नव्हते पण स्री वर अत्याचार होतो हे आपल्याला दिसून येत त्यामुळे मी आपल्यासमोर बोलायचे म्हणून महिलांविरुद्ध गुन्हेगारी यात तरुणांचा सहभाग काय असावा हे सांगायची वेळ आजच्या काळात उदभवत आहे “यंत्र नार्यस्तू पूजन्ते रमन्ते तंत्र देवता” याचाच अर्थ ज्याठिकाणी स्त्री चे पूजन केले जाते तिला मान दिला जातो त्या ठिकाणी साक्षात परमेश्वर असतो, असे सुभाषित सांगणारे वेदकालीन ऋषी किती श्रेष्ठ होते ते आपल्याला दिसून येते पण आजचा तरुण कुठे तरी भरकटत चाललाय असे दिसून येते आहे भर बाजारात नारीची अब्रू लुटनाते आपल्याला तरुणच दिसून येतात आणि एकीकडे बलात्काराला शिक्षा झालीच पाहिले असे म्हटणारे देखील तरुण पुरुष आपल्याला दिसून येतात पण फक्त पुरुषच स्त्री वर अन्याय करत नसून काही प्रमाणात महिला देखील आहेत.
स्त्री ला कायम दुय्यम स्थान दिले जाते आणि तिला फक्त चूल आणि मूल एवढाच संबंध लावला जातो हे कुठे तरी रोखण्यासाठी तरुणांनी शाळा , कॉलेज मध्ये जाऊन पथनाट्य सादर करणे गरजेचे आहे तरच खरा युवक तयार होईल त्यासाठी स्वा. विवेकानंद , छत्रपती शिवाजी महाराज , रमाबाई रानडे , आनंदीबाई जोशी यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या नुसत्या सजऱ्याकरून चालणार नाही तर त्यांचे विचार अमलात आणणे आजच्या काळात गरजेचे आहे स्वा. विवेकानंदानी आपल्या आईला जगद्जननी मानलं होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पाहताच शिवाजी महाराज म्हणतात, ” अशी आमची आई असते तर” असा दृष्टीकोन तरुण पिढीनं बदलणे गरजेचे आहे.
आपल्याला पण बहीण , काकू, मावशी, मामी, वाहिनी आहे आणि आपल्याला जन्म देणारी आई सुद्धा एक स्त्रीच आहे ना मग फक्त वंशाचा दिवाच का पाहिजे मुलाप्रमाणे मुलीला पण तेवढेच समान वागणूक देणे गरजेचे आहे ते तरुण नक्की करेल असा मी ठाम विश्वास देतो आणि माझ्या लेखणीला विराम देतो
जय हिंद जय महाराष्ट्र !
– गुरुनाथ जोशी