मनी हाईस्ट भाग २ | दुसरी मीटिंग

मनी हाइस्ट मराठी भाग १ २ ३ ४ ५ ६ ७

मनी हाईस्ट भाग २ | दुसरी मीटिंग –

गुर्जी – (बोर्ड वर काहीतरी लिहीत ) सातारा कुठ आहे ?

अकोला – लेटीगेशन मध्ये…

गुर्जी – ( चष्मा काढून टेबल वर ठेवतो )

अकोला – सॉरी सॉरी ..तो मुतायला गेलाय..मी आपलं गंमत केली…

नाशिक – (अकोल्या कडे पाहत वाइन पित पित)गुर्जी ह्या चुत्याची गरज आहे का आपल्याला ?

गुर्जी -(तिरप पाहत) या मिशन साठी अखंड महाराष्ट्र असणं गरजेच आहे…मुंबई कुठाय ?

अकोला – ( बोट वर करून) गुजरात्यांकडे…

नाशिक -( डोळे बंद करून मान नकारार्थी हलवत ) परत मस्करी केली ना नागडा करून फरफटुन  मारीन… भाड्या

अकोला – यावेळी मस्करी नव्हतीस खरच आहे की..

गुर्जी – ( बोर्ड कडे पाहत ) कामाकडे वळूया ??? मी मागची २८ वर्षे हाच प्लॅन करत होतो आणि आजही करतोय..या मिशन नंतर आपण इतके पैसे कमवू की..

नाशिक -(त्याला थांबवत) हा पण, तुमचं वय तर बत्तीस तेतीस आसन मंग कस ?

गुर्जी -( मोठा श्वास घेऊन, चश्मा काढून  पुसत) मी मागच्या आठवड्यापासून मी करतोय, माझा बाप करत होता प्लॅन मागच्या २ दशकांपासून आणि त्यांनीच मला सांगितलाय..

अकोला -(आभाळाकडे बघत) हा आसन आसन…ते कुठ गेले..म्हणजे तुम्ही टक्कल पण नाय केलं म्हणून विचारतोय…

धाराशिव -(मुंबईकडे बघत) ह्यांच्यात नसतेन टक्कल करीत

मुंबई -(हेडफोन काढत) ऐसे भी एकीच आठवडा हुआ है ना… दसवे को करेंगे वो टक्कल..

गुर्जी – ( शांत पणे पाणी पीत ) मी काही सांगू का ? आहेत ते, व्यसनमुक्ती केंद्रातून निघालेत आज पोचतील सकाळी..मी काय सांगतो ते ऐका बाकी सोडा…

आपण एका बँकेवर दरोडा टाकणार आहे. आणि तुम्ही सगळे त्यात सामील असणार…मी सांगेल तस करायचं..फक्त श्वास तुम्ही स्वछेने घेऊ शकता बाकी मी सांगेल तसच…

अकोला – मी तयार आहे…फक्त एक अट आहे…

गुर्जी- घरी जा

अकोला – मी विनाअट तयार आहे.

गुर्जी- उद्या मी काय, कस आणि कुठ हे सांगेन तोवर माझा बाप म्हणजे पुणे पण येईल…

क्रमशः मनी हाइस्ट मराठी भाग २

मनी हाइस्ट मराठी भाग १

मनोज शिंगुस्ते

Leave a comment