पनीर रसमलाई

By Snehal's Kitchen Corner Recipe 1 Min Read
पनीर रसमलाई

पनीर रसमलाई –

पनीर रसमलाई Recipe | Paneer Rasmalai Recipe in Marathi.

साहित्य:

१०० ग्रॅम पनीर, १ वाटी साखर, ४ वाटी पाणी

रबडी: अर्धा लिटर दूध, ५ चमचे साखर, वेलची पूड, केशर, सुकामेवा आवडीप्रमाणे

कृती:

१. प्रथम ताजे पनीरचे छोटे तुकडे करून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी.

२. हाताला तूप लावून त्याचे छोटे/मोठे बॉल्स करून घ्यावेत.

३. एकीकडे कुकरमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यात साखर टाकून विरघळून घ्यावी आणि त्यात पनीरचे बॉल्स सोडावेत आणि एक  शिट्टी करून घ्यावी.

४. पनीर बॉल्समधील पाणी अलगद हाताने काढून घ्यावे आणि बॉल्स थंड होऊ द्यावेत.

५. दुसरीकडे कढईमध्ये दूध थोडे आटवून घ्यावे. त्यात साखर, वेलची पूड, केशर, सुकामेवा घालावा. अश्याप्रकारे ही तयार झालेली रबडी थंड होऊ द्यावी.

६. एका बाउलमध्ये पनीर बॉल्स घेऊन त्यावर थंड झालेली रबडी घालावी आणि ५-६ तास फ्रिज मध्ये ठेवावी.  वरतून सुक्यामेव्याने सजावट करावी आणि थंडगार सर्व्ह करावी.

अश्याप्रकारे आपली झटपट पनीर रसमलाई तयार!

© Snehal Kalbhor

https://www.instagram.com/s_n_e_h_a_l_k?r=nametag

Leave a comment