सरदार पानसे वाडा, सोनोरी –
भीमराव सरदार पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे मल्हारगड किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी सरदार पानसे वाडा आहे.सोनोरी हे गाव सासवड पासून आठ ते दहा किमी अंतरावर आहे. पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावामध्ये असलेल्या सरदार पानसे वाड्यामध्ये पूर्वी अनेक वास्तू असाव्यात, परंतु सध्या मात्र या वाड्यात दोन, तीन इमारती उभ्या आहेत. त्यामध्ये, एक वाडा, स्वारीचा गणपती व लक्ष्मीनारायण मंदिर यांचा समावेश आहे. 1995 साली प्रदर्शित झालेल्या दोघी या चित्रपटाचे चित्रीकरण या वाड्यात झालेले आहे. वाडा अतिशय भव्य असून त्याला सहा बुरुज आहेत. मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या या वाड्यात एकेकाळी अनेक सरदारांची ऊठबस असेल. या वाड्याच्या तटबंदीची उंची वीस फूट आहे तर रुंदी नऊ फूट आहे.
भौगोलिक स्थान (Location) –
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात असलेले सोनोरी हे पायथ्याचे गाव पुण्याहुन ३० कि.मी.वर तर सासवडहुन हे अंतर ६ कि.मी.असुन या मार्गाने गाडी थेट वाड्यापाशी जाते.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
सोनोरी गावातून गेल्यावर सरदार पानसे यांचा वाडा पाहण्या सारखा आहे. वाड्याच्या बाजूला असणारे ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. तसेच लक्ष्मी-नारायण मूर्ती असलेले मंदिर पाहण्या सारखे आहे. अखंड संगमरवरी मध्ये घडवलेली ही नारायणाची मूर्ती लक्ष वेधून घेते. पुरातन स्वारीचा गणपती मंदिर मन मोहून टाकते.पेशव्यांचे तोफखाना प्रमुख आणि महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा गिरिदुर्ग बांधणारे स्सरदार भीमराव पानसे यांचा हा वाडा. सासवड पासुन जवळ असलेल्या सोनोरी येथिल सरदार पानसे वाडा. हा वाडा सोनोरी गावच्या ईशान्य बाजूला आहे.
संपूर्ण वाड्याला तटबंदी असून वाड्याला एकूण एकूण सहा बुरुज आहेत . वाड्यामध्ये स्वारीचा गणपती मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर हि दोन मंदिरे आहेत. मुख्य वाड्याच्या समोर दगडी बांधीव विहीर पाहायला मिळते. मुख्य वाड्याची इमारत २ मजली आहे. पूर्वी या वाड्याचे ३ मजले होते.असं सांगितले जाते. इतिहासाचे साक्षीदार असलेला हा वाडा पाहताना अंगावर शहरे आल्या शिवाय राहत नाही. १९९५ मध्ये आलेल्या दोघी या चित्रपटाचे चित्रीकरण याच वाड्यात झाले होते. वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यास लाकडी जिना आहे.या मजल्यावर बरीच पडझड झालेली पाहायला मिळते.
२५० ३०० वर्षापूर्वीचा हा वाडा पाहताना आपण त्या काळात वावरत आहोत याचे भास होतो. लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोर एक पाण्याचे कुंड पाहायला मिळते.बाजूलाच गणेश मंदिर पाहायला मिळते. मंदिराकडे जाताना आपल्याला पडलेले आणखी एक प्रवेशद्वार पाहायला मिळते. पूर्वी वाड्याच्या चौकांना पिवळा चौक, हिरवा चौक, माणिक चौक अशी नावे होती. याच वाड्यामध्ये हत्तींचा पिलखाना आणि घोड्यांची पागा आपल्याला आजही पाहायला मिळते.
वाड्याच्या बाहेर राम मंदिराच्या समोर आपल्याला भीमराव पानसे यांची समाधी पाहायला मिळते. वडगावच्या लढाईत इंग्रजांना प्लावून लाऊन सरदार भीमराव सोनोरीला परतले आणि त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि मार्च १७७९ साली ते काळाच्या पडद्याआड गेले. त्यांनी बांधलेला मल्हारगड आजही त्यांच्या पराक्रमाची आणि कर्तुत्वाची साक्ष देत उभा आहे.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
सोनोरी हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी गाडीने थेट सोनोरी गावात जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
सासवड परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
सोनोरी गावात व परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
सोनोरी गावात व परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
इतिहास (History) –
भीमराव सरदार पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे मल्हारगड किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
पाणी आणि जेवण घेऊन जाणे.
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
मस्तानी तलाव , दिवेघाट आणि सासवड मधील घाट व मंदिरे
संदर्भ – https://www.discovermh.com/