रामेश्वर कुंड आणि रामनदी उगम, भूकुम –
रामनदी चा उगम भुकुम गावात रामेश्वर कुंड जवळ होतो तर ती सोमेश्वर पाषाण या ठिकाणी जाऊन मिळते. रामनदी च्या काठावर भुगाव, बावधन बुद्रुक खुर्द, सुतारवाडी पाषाण ही गावे वसलेली आहेत. ही फारशी माहिती नसलेली अपरिचित नदी आजमितीला अखेरची घटका मोजत आहे.सर्व गावांच्या मधून रामनदी वाहत पाषाण तलावाला जाऊन मिळते. ही सर्वच गावे डोंगरांच्या मध्ये बसलेली आहेत.
भौगोलिक स्थान (Location) –
भुकूम ,भुगाव आणि दोन्ही बावधन ही गावे पुण्याच्या पश्चिम दिशेला पुणे कोलाड हायवेवर एका सरळ रेषेत बसलेली आहेत. पुण्यापासून ४० कि.मी. वर भूकुम गाव आहे.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
रामनदीच्या उगम असलेल्या सीतेच्या डोंगरावरून रामनदी भुकूम गावातील रामेश्वराच्या मंदिरापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात मिळते इथपर्यंत रामनदीचे अस्तित्व कुठे दिसतच नाही .रामेश्वर कुंड. परंतु ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जलाशय तुडूंब भरतो त्यावेळेस रामनदीचे विस्तीर्ण पानवाहक क्षेत्र, तिचे छोटे छोटे अोढे -नाले ,तीचा मुख्य प्रवाह सगळ सगळ नजरेसमोर उभे राहते.या पुढे मात्र तीने नदीचे रूप घेतलेले असते ते थेट पाषाण तलावापर्यंत.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातून बाहेर पडणारया रामनदीच्या प्रवाहात भुगाव मधील तिच्या पानवाहक क्षेत्राचे पाणी जमा होते . पुढे रामनदीच्या दोन्ही बावधनमधील पानवाहक क्षेत्रातील पाणी रामनदीत जमा होते . आणि याच पाण्यावर स्वातंत्र्यपुर्व काळात इंग्रजांनी पाषाण सुतारवाडी भागात बांधलेला पाषाण तलाव पावसाळ्यात खुप लवकर भरतो.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
भूकुम हे पुण्यापासून सुमारे ४० कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी अथवा बस ने आपण भूकुमला जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे 2 तास लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
मंदिरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.