श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २ –

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २ | अध्याय १ –  श्लोक क्र. ५ ते ८

मूळ श्लोक:

धृष्टकेतुश्र्चेकितानः काशीराजश्र्च वीर्यवान् |
पुरूजित्कुिन्तभोजश्र्च शैब्यश्र्च नरपुङ्गवः ||१-५||

धृष्ट्केतुः = धृष्टकेतु; चेकितानः = चेकितान; काशिराजः = काशीराज;

च = सुद्धा; वीर्य-वान् = अत्यंत बलशाली; पुरुजित् = पुरुजित;

कुन्तिभोजः = कुंतिभोज; च = आणि; शैब्य = शैब्य; च = आणि; नरपुङ्गवः = मानव समाजातील श्रेष्ठ वीर

अर्थ :

तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि आणि बलशाली असे धृष्टकेतु, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत.

‘धृष्टकेतुः’ – कर्तव्यात दूढ असणारा, ‘चेकितान ‘ – स्वैरभैर भटकणाऱ्या मनाला लगाम घालून योग्य स्थळी मन स्थिर ठेवणारा, ‘काशिराजा:’ कायारूपी काशीमध्येच साम्राज्य आहे ‘ पुरुजित्‌’ – स्थळ, सक्ष्म व कारण अशा शरीरावर विजय मिळवून देणारा, ‘ कुन्तिभोज: ‘ – कर्तव्याच्या सहाय्याने मृत्युलोकावर विजय मिळवणारा, सर्व मनुष्यांमध्ये श्रेष्ठ, ‘शैब्य’ – म्हणजे सत्य व्यवहार.

मूळ श्लोक:

युधामन्युश्र्च विक्रान्त उत्तमौजाश्र्च वीर्यवान् |
सौभद्रो द्रौपदेयाश्र्च सर्व एव महारथः ||१-६||

युधामन्युः = युधमन्यू; च = आणि; विक्रान्तः = पराक्रमी;

उत्तमौजाः = उत्तमौजा; च = आणि; वीर्य-वान = अत्यंत शक्तिशाली; सौभाद्रः = सुभद्रेचा पुत्र; द्रौपादेयाः = द्रौपदीपुत्र; च = आणि; सर्वे = सर्व; एव = निश्चितपणे; महा-रथः = महारथी

अर्थ :

येथे पराक्रमी युधामन्यु, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभाद्रपुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. युद्धाला आवश्यक मनोधारणा असणारा पराक्रमी ‘ युद्धामन्यु’ ज्याच्याजवळ उत्तम प्रकारचे ओज आहे, तेज आहे असा ‘ उत्तमौजा’ भक्कम आधार, पाठबळ मिळाले की मन निर्भय बनते, अशा भक्‍कम आधारामुळे जो निर्भय आहे असा सुभद्रपुत्र अभिमन्यु. ध्यानरूपी द्रोपदीचे पाच पुत्र वात्सल्य, लावण्य, सहदयता, सौम्यता व स्थिरता हे सर्वजण थोर महारथी आहेत. साधनेच्या मार्गावर वाटचाल करण्याची त्यांची संपूर्ण योग्यता आहे, क्षमता आहे.

अशा प्रकारे पांडवांच्या पक्षातील दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या पंधरा- वीस योद्धयांची नावे दुर्योधनाने घेतली. असत्‌ प्रवृत्तीचा राजा असूनही ‘ मोहा ‘ मुळेच सत्‌ प्रवृत्ती समजणे शक्‍य होते. ‘ मोह ‘ तसे करण्याला बाध्य करतो. त्यानंतर स्वतःच्या पक्षातील योद्धयांविषयी तो संक्षेपाने द्रोणाचार्यांना सांगतो. जर बाह्य युद्ध असेल तर आपल्या फौजेची बढाई त्याने मारली असती. येथे विकार कमी सांगितले गेले; कारण विकार नाशवंत असतात ब त्यांच्यावर विजय प्राप्त करावयाचा आहे. फक्त सहा-सात विकारच त्याने सांगितले की ज्यांच्या अंतरंगात संपूर्ण बहिर्मुखी प्रवृत्तींचा वास आहे.

मूळ श्लोक:

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम |
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रविमी ते ||१-७||

अस्माकम् = आपले; तु = परंतु; विशिष्टः = विशेष बलशिली; ये = जे; तान् = त्यांना; निबोध = नीट जाणून घ्या; द्विज-उत्तम = हे ब्राह्मणश्रेष्ठ; नायकः = नायक, सेनापती; मम = माझ्या; सैन्यस्य = सैन्याचे;

संज्ञा-अर्थम् = जाणून घेण्यासाठी; तान् = त्यांना; ब्रवीमि = मी सांगतो; ते = तुम्हाला

अर्थ :

हे ब्राह्मणश्र्ष्ठ ! तुमच्या माहितीकरिता, माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकार्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. हे द्विजश्रेष्ठा, आता आमच्या सैन्यात जे जे प्रमुख आहेत, जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत त्यांची नावे आपल्याला कळण्यासाठी सांगतो; ते आपण ऐळून घ्या, जाणून घ्या.

बाह्य युद्धात सेनापतीला द्विजश्रेष्ठ म्हणून संबोधणे समयोचित नाही. वास्तविक गीता म्हणजे अंत:करणातील दोन प्रवृत्तींचा संघर्ष आहे व तेथे द्वैत वृत्तीच्या आचरणाचे प्रतीक म्हणजे गुरू द्रोण आहेत. जोपर्यंत आम्ही आमच्या आराध्यापासून लेशमात्रही अलग असतो तोपर्यंत तेथे प्रकृती विद्यमान असते, हैतभाव उपस्थित असतो. या ‘ द्वि’ वर विजय मिळवण्याची प्रेरणा आम्हाला गुरू द्रोणाचार्या पासून मिळत असते. आमचे अर्धवट अपूर्ण ज्ञानच आम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देत असते. ते पूजास्थल नाही, मंदिराचे प्रांगण नाही. ती युद्धभूमी आहे. तेथे शोर्यसूचक संबोधन असायला हवे. आता असत्‌ प्रवृत्तीचे प्रमुख कोण कोण आहेत?

मूळ श्लोक:

भवान्भिष्मश्र्च कर्णश्र्च कृपश्र्च समितिञ्जयः |
अश्र्वत्थामा विकर्णश्र्च सौमादाित्तस्तथैव च ||१-८||

भवान् = आपण स्वतः; भीष्मः = पितामह भीष्म; च = आणि; कृपः = कृपाचार्य; च = तथा; समितिञ्जयः = सोमदत्ताचा पुत्र; तथा = सुद्धा;

एव = नक्कीच; च = सुद्धा

अर्थ :

येथे आपण स्वतः, भीष्म, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नाच सोमदत्तपुत्र असे युद्धात नेहेमी विजयी ठरणारे योद्धे आहेत.

‘एक तर स्वत: आपण ( द्वैतभावाचे आचरणरूपी द्रोणाचार्य ) आहात. भ्रमरूपी – संदेहरूपी पितामह ‘ भीष्म ‘ आहेत. भ्रम हे या विकारांचे उद्गम स्थान आहे आणि अंतापर्यंत तो जिवंत रहात असतो; म्हणून तो पितामह आहे. सर्व सेना मरून गेली तरी हा जिवंत होता. शरशय्येवर निश्वेतन अवस्थेत पडून होता; पण तरीही तो जिवंत होता. म्हणून भीष्म हा भ्रमरूप आहे. या प्रमाणेच असत्‌ कर्मरूपी कर्ण व संग्रामात सदैव विजयी होणारे ‘कृपाचार्य’ ( आमच्या पक्षात ) आहेत. साधनेच्या अवस्थेत साधकाकडून घडणारे कृपेचे आचरण म्हणजेच कृपाचार्य होय. परमेश्वर कनवाळू आहे, तो कृपेचे धाम आहे. त्याच्या प्राप्तीनंतर संताचे स्वरूपही असेच कनवाळू बनते. परंतु या साधनेच्या कालात जोपर्यंत आम्ही परमे श्वरापासून अलग राहतो, तोपर्यंत तोही आमच्यापासून दूरच असतो, अलग असतो. असत्‌ प्रवृत्ती जिवंत असते, ती मोहाने गुरफटलेली असते. अशा परिस्थितीत साधक जर कनवाळूपणाने वागला तर तो नष्ट होऊन जातो.

सीतेने दया दाखवली; त्यामुळे तिला काही काळ लंकेत राहून प्रायश्चित करावे लागले. विश्वामित्र क्षणभर दयाद्र बनले त्यामुळे त्यांना पतीत व्हावे लागले. योग सूत्रकार महर्षि पतंजलीही म्हणतात – ‘ते समाधावुपसगि व्युत्थाने सिद्धय:’ ( ३/३७ ). व्युत्यान कालात ( समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर ) सिद्धी प्रकट होतात. वास्तविक त्या सिद्धी आहेत. परंतु काम, क्रोध, मोह या विकारांइतक्याच कैवल्य प्राप्तीमध्ये त्या अडसररूप विध्नरूप आहेत. गोस्वामी तुलसीदासांचेही असेच मत आहे.

‘छोरत ग्रन्थि जानि खगराया।
विष्न अनेक करड तब माया ।।
रिद्धि सिद्धि प्रेरड बहु भाई ।
बुद्धि्हि लोभ दिखावर्हि आई ।।
( रामचरितमानस, ७/११७/६-७)

माया अनेक विघ्ने, अडचणी निर्माण करत असते. ती साधकाला अनेक सिद्दि प्रदान करते. साधकाला ती सिध्द बनवते. असा सिद्ध प्राप्त झालेला साधक मरणासन्न मनुष्याच्या जवळून गेला तरी तो मनुष्य उठून उभा राहील; एवढी सिद्धी त्याला प्राप्त होते. अर्थात तो मनुष्य भले जिवंत झाला; पण साधकाने ते स्वतःचे सामर्थ्य समजले तर तो नष्ट होऊन जाईल. एक रोगी बरा झाला की त्याच्या जागी अनेक रोगी जमतील. त्यामुळे भजन-चिंतनामध्ये खंड पडेल व साधक त्यामुळे इतका बहकत जाईल को प्रकृतीचे बाहुल्य वाढून तो प्रकृतीच्या पाशात अडकला जाईल.

जर लक्ष्य दू! असेल आणि जर साधकाने कृपाळूपणा केला तर त्याच्या त्या कृपेच्या आचरणामुळे ‘ समितिंजय ‘ ( संग्रामात सदैव विजयी होणारी ) अशा सर्व सेनेवर तो विजय मिळवू शकेल व म्हणूनच जोपर्यंत लक्ष्यपूर्ती होत नाही तोपर्यंत साधकाने अत्यंत सतर्क, सावध राहिले पाहिजे. ‘दया बिनु सन्त कसाई, दया करी तो आफत आई । ‘ परंतु अपूर्ण अवस्थेत ही दया म्हणजे ज्याचे दमन करण्यास अशक्य अशा असत्‌ प्रवृत्तीच्या दुर्धर्ष योद्धयासारखी आहे. या प्रकारे आपल्या पक्षात आसक्तीरूपी आश्चत्थामा आहे, विकल्परूपी विकर्ण आहे व भ्रममयी श्वासासारखा असणारा भुरिश्रवा आहे. हे सर्व बहिर्मुखी प्रवाहाचे मुख्याधिकारी आहेत.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment