स्वराज्य स्तंभ, नसरापूर

By Bhampak Places Articles 3 Min Read
स्वराज्य स्तंभ, नसरापूर

स्वराज्य स्तंभ, नसरापूर –

भोरला येताना वाटेत नसरापूर फाट्यावर थांबून तिथला भोरच्या संस्थानिकांनी बांधलेला स्वराज्य स्तंभ बघायलाच हवा. नसरापूर फाट्याच्या समोरच्या बाजूला कुंपण घातलेल्या प्रांगणात एक दगडी स्तंभ आहे. भोर संस्थांचे अधिपती श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्मारक म्हणून हा स्वराज्य स्तंभ उभारला आहे.

भौगोलिक स्थान (Location) –

पुणे ते नसरापूर अंतर ४० कि.मी. आहे.

पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –

नसरापूर फाट्याच्या समोरच्या बाजूला कुंपण घातलेल्या प्रांगणात एक दगडी स्तंभ आहे. भोर संस्थांचे अधिपती श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्मारक म्हणून स्वराज्य स्तंभ उभारला आहे. एका दगडी चौथऱ्यावर मोठ्या डौलात उभा असलेला असा हा स्वराज्य स्तंभ. या स्तंभाच्या पायथ्याशी तत्कालीन भोर संस्थानात असणाऱ्या किल्ल्यांची दिशा आणि त्यांची अंतरे संगमरवरी पट्ट्यांवर कोरलेली आहेत.

शिवरायांच्या स्वराज्याचेच जणू हे प्रवेशद्वार! मराठी-इंग्रजी भाषेतील या मार्गदर्शिकांवर तत्कालीन गावे-शहरे, गडकोटांचे उल्लेख, त्यांची या स्तंभापासूनची अंतरे दिलेली आहेत. उत्तरेस सुधागड ४१ मैल, सिंहगड साडेअकरा मैल, तुंग किल्ला ३९ मैल, तिकोना ३८ मैल; आग्नेयेस पुरंदर ६ मैल; नैर्ऋत्येस आंबाड खिंड १६ मैल, भोर ८ मैल, रोहिडा१२ मैल, आंबवडे साडेचौदा मैल, रायरेश्वर साडेअठरा मैल तर पश्चिमेस राजगड साडेतेरा मैल आणि तोरणा १९ मैल अशी माहिती दिलेली आहे.

भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –

आपण कधीही भेट देऊ शकता.

कसे पोहोचाल (How to reach) –

पुणे ते नसरापूर अंतर ४० कि.मी. आहे.

कसे जाल (How to go) –

खाजगी अथवा बस ने आपण नसरापूरला जाऊ शकता.

जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –

पुण्यापासून आपल्याला अंदाजे 2 तास लागतात.

राहण्याची सोय (Accommodation) –

परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.

जेवणाची सोय (Dining)-

परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी (Drinking water)-

आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

इतिहास (History) –

हा स्तंभ इथेच का ? याबद्दल एक कथा सांगतात की तोरणा किल्ला घेण्यासाठीचे डावपेच शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी याच ठिकाणी बसून आखले, अशी या संस्थानिकांची ठाम समजूत होती. स्वराज्याचा श्रीगणेशा ज्या जागी झाला तिथेच त्याचे स्मारक हवे म्हणून संस्थानिकांनी स्वराज्य स्तंभ इथे उभारले.

प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
Leave a comment