माणसाचे मोठेपण

By Bhampak Articles Laxman Asbe 2 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

माणसाचे मोठेपण –

माणसाचे मोठेपण ठरविण्याची परिमाणे वेळेनुसार आणि गरजेनुसारबदलत राहतात . आपण अडचणीत असताना आपल्याला मदत करणारा आपल्याला मोठा वाटतो , तरकधी ज्याच्यामुळे सर्वांना सुरक्षित वाटतेतो मोठा वाटतो , कोण धनानेकोण मनानेकोण वयानेकोण बलाने कोण ज्ञानानेकोण कलेने कोण दानानेकोण नम्रतेनेकोण क्षमेनेकोण दयेने , तरकोण परोपकार आणि सेवेने मोठा ठरविला जातो . हे सर्वजण तात्कालिक मोठे असतात, सदासर्वकाळ किंवा नित्य मोठायांपैकी कोणी असू शकत नाही .

आपण मोठे असावे असे अनेकांना वाटते आणि आपल्याला लोकांनी मोठे मानावे आणि म्हणावे असे सर्वांना वाटत असते आणि यासाठी माणूस आयुष्यभर अट्टाहास करत राहतो आणि आयुष्यातील बराचसा काळ वाया घालवतो . जी माणसे खरोखर मोठी असतातत्यांचे मोठेपणसूर्यासारखे तेजस्वी असते, ते स्वयंसिध्द असते, ते आपोआप व्यक्त होत असते. त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडला नाही तरी त्यांच्या फक्त उपस्थितीचा प्रभाव आपोआप पडत असतो. शुकदेव ज्यावेळी परिक्षिताच्या दरबारात गेले त्यावेळी त्यांना पाहताच सर्व धर्मसभा उठून उभी राहिली , त्यातील प्रत्येक व्यक्ती शुकदेवांपेक्षा वयाने मोठी होती .

व्यवहारी जगात खरा मोठेपणागरजेनुसार ठरत राहतो , तो सतत बदलत राहतोम्हणून तो खरा नसतो आणि _माणूस या सत्य आणि नित्य नसलेल्या मोठेपणासाठी जीवाचे रान करत राहतो. धर्मशास्त्रानुसार या जगात सन्यासी सर्वात मोठा समजला जातो . याचा अर्थ मोठे होण्यासाठीसर्वाचा त्याग करावा लागतो, म्हणजे संसारी माणसाला मोठे होताच येत नाही असे नाही .

विश्वमाऊली ज्ञानदेवांनी सन्यास्याची जी व्याख्या केलेली आहे, ती संसारी माणसासाठीच आहे, मी माझे ही आठवण ।विसरले जयाचे अंतःकरण ।। पार्था तो सन्यासी ।जाण निरंतर ।।_ मी आणि माझे याचा त्याग केल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही_. जी माणसे मोठेपणा व्यक्त करण्यासाठी धडपडत असतात , वास्तवात ती फार छोटी असतात. मोठेपणा जग देत असते , तो मागून कोणालाही मिळत नाही , मिळालेला नाही आणि मिळणार नाही.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार 

Leave a comment