पाकीजा भाग १

By Bhampak Story Articles Sameer Khan 10 Min Read
पाकीजा भाग १ 2

पाकीजा भाग १ –

(पैंजण या कथेस दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर पुन्हा एकदा आपल्या भेटीला घेऊन येत आहे एक नविन कथा “पाकीजा” .ही कथा तशी प्रतिलिपीवर प्रकाशित केली आहे तरीही ईथल्याही वाचकांना नक्कीच आवडेल अशी आशा करतो. ह्या कथेतली पात्रे सत्य असूनही प्रत्यक्षात त्यांचा “असा” काहीही संबंध नाही..हा मात्र कल्पनाविलास आहे…)

फैजाबादच्या नवाब हैदरची “दुसर्या” बेगमची एकुलती एकलाङकी लेक मरीयम आता 8वर्षाची झाली होती….पिढानपिढ्या चालत आलेली “नवाबी”कधीच संपुष्टात आली होती.असही ईन्ग्रज राज्यातच नवाबपद ‘नाममात्र’ राहीले होते. स्वातंत्र्यानंतर तर आता फक्त नवाब हा ‘लकबच’ ऊरला होता. तो काळ होता 80 च्या दशकाचा..’जुने’ टाकून ‘नवे’ स्वीकारण्याचा..मात्र अजूनही नवाबसाहेब त्याच शानोशौकत व विलासी जीवनात रममाण होते. तीन प्रमुख ‘बेगम’पैकी बङी बीचा कधीच ईन्तेकाल (मयत) झाला होता..निपुत्रिकच गेली होती बिचारी…दुसर्या बेगमला ‘मरीयम’ ही कन्या तर तिसर्या बेगमला पुत्र ‘ईरफान अली’ होता.

स्वातंत्रानंतर असही सर्व संस्थाने भारतात विलीन झाली होती.आपसूकच सर्व संपत्ती सरकारजमा झाली होती. फैजाबादही त्यास अपवाद नव्हते.खानदानी हवेली मात्र अजूनही गतवैभवाची आठवण गिरवत नवाबसाहेबाकङे होती,काही जमीनी ‘गिरवी (तारण)’ असल्या तरी ऊत्पन्न देत होत्या.असे असूनसुद्धा ईतका मोठा ङोलारा ‘गजचालीने’ का होईना चालत होता.मरियमचा जन्म अशा विचित्र परीस्थितीत झाला होता.बङी बी निपुत्रिक वारल्याने नवाब हैदरने दुसरे लग्न केले,मात्र तीची कूसही ऊजवेना..शेवटी तिसरी बेगम हवेलीत आली व सर्व वातावरणच बदलले.साधारण परीवारातलीअसूनही कमालीची गर्विष्ठ,रागीट,हेकेखोर बेगम पुत्रजन्म (ईरफान अली) झाल्यावर आणखीनच कहर करू लागली. ईरफान अगदी 12 वर्षाचा असताना एक चमत्कार झाला..नवाबच्या पहील्या बेगमलाही दिवस गेले..व तीच्यामाथी असलेला ‘बान्झ’चा शिक्का पुसला जाऊन चान्दनीसारखी पोर “मरीयम” जन्मास आली ।मरीयमची आई मोठी बेगम असूनही कधीच कोणता अधिकार गाजवत नसे…मात्र तिसरी व सर्वात लहान बेगम पुत्र असल्याने “राज्याला वारस देणारी” म्हणून मिरवत असे.मरीयम ची आई मोठी बेगम असूनही हवेलीत ती नाममात्र म्हणूनच होती, हवेलीवर एकाधिकार तिसर्या बेगमचाच होता.पर्यायाने मरीयम व तिच्या आईच्या पदरी हेटाळणीच आली होती.

नवाबसाहेब मात्र आपल्या प्रिय पुत्रीवर मुलापेक्षा जास्तच प्रेम करत असत.मोठी हवेली,नोकरचाकर,सर्वसंपन्नता असूनही मरीयम कुठेतरी एकाकीच होती.ना कोणी मित्र ना कोणी सखी..ती बापूङी एकटीच आपल्या बाहुलीशी खेळत असे,तीला खोटखोट जेवण भरवत असे,लुटूपुटूचे लग्नही लावत असे.मोठ्या प्रशस्त हवेलीत तीचा जीव दङपून जात असे…त्यात छोटी अम्मीचा दरारा ईतका की बास !! तीच्या आवाजानेच तीचा थरकाप होई….तीची स्वतःची अम्मी नेहमीच अल्लाहच्या ‘ईबादत’ मध्ये मशगूल असे..फार कमी वेळ ती तीच्या सोबत असे..नवाबसाहेबाचीही भेट क्वचितच होत असे…”बानो” जी तीची दाई होती ती मात्र कायम मरीयमसोबत असे.तीच्या प्रत्येक सुख दुखः ची साक्षीदार..तीच्या बालमनाला पङणार्या प्रत्येक प्रश्नाचे ऊत्तर !!

“दाईमाँ क्या कोई हमसे प्यार नही करता ?”

“नही बेटी सब करते है।”

“फिर अब्बू हमसे रोज क्यो नही मिलते ?”

“वो नवाबसाहब है बेटी..अपने कामो मे मसरूफ रहते है !”

“पर अम्मी तो मसरूफ नही रहती फिर क्यो हरवक्त हमारे साथ नही बिताती ?”

“अल्लामियाँ वहा दूर आसमान मे बैठे है वो ऊनकी ईबादत करती है..तूम भी तो नमाज सीख रही हो ना फिर ?”

“पर मै तो अपनी गुङीया को अकेली नही छोङती..”अशा असंख्य प्रश्नाची ऊत्तरे देता देता म्हातार्या बानूची दमछाक होत असे..

हसत बागङत खेळणारी मरीयम कलेकलेने वाढत होती..वाढणार्या वयासोबतच तीचे एकाकीपण वाढत होते..काहीसा हट्टी स्वभाव तीच्या वागण्यात आला होता…तीला साभाळणारी बानो मात्र थकली होती. निसर्गनियमाप्रमाणे मरीयम न्हातीधूती झाली होती..तीच्या लग्नाच्या चर्चा होत होत्या…स्थळे पाहीली जात होती..मात्र मरीयम या कशासच तयार नव्हती. तीचा आतयायीपणा दिवसेदिवस वाढतच होता..तिसर्या बेगमच्या (छोटी अम्मी) ङोळ्यात ती आता जास्तच खूपत होती….

“कुछ सोचा है नवाबसाहब उस मरीयम के बारे मे ? दिनभर हवेलीमे “बेपर्दा” घूमती रहती है..गनीमत है अबतक हवेली के बाहर कदम नही पङे वरना हो चूका सब….आप इस बारे मे उसकी माँ से बात क्यू नही करते ? मै भी माँ ही तो हू उसकी..फिक्र होती है इसलिए बोल रही हूँ !” छोटी अम्मी गरळ ओकत म्हणाली..!

“बस भी करो बेगम..हम उसके बाप अभी तक जिन्दा है ..उसका भला बूरा खूब समझते है..!”

”  यहाँ तो बात करना दुश्वार हो गया है..कही भी जाए या जहन्नम जाए माँ बेटी..मुझे क्या पङी है ? ”

“खुदा के लिए बस करो बेगम…”

“हा हूँ तो सौतेली ही ना..चाहे जिसके साथ रंगरलीया मनाए मुझे क्या..! ”

“कानात शिसे ओतल्यागत कङमङून नवाबसाहब खाली कोसळले “……………………………..

…..”ईन्हे दिल का दौरा पङा है…अब तो खतरा टल गया पर कोई ऐसी बात ईनके सामने ना की जाए की ईन्हे तकलीफ हो ! सिर्फ मेरी जङीबूटी की दवा ही काम नही करेगी बेगमसाहीबा..विलायती ङाक्टर भी बुलाना पङेगा..!!” म्हणत हाकीमसाहब निघून गेले ।आता तर मरीयम व तीच्या आईच्या ऊपेक्षेस पारावार ऊरला नाही .

“कलमूई..सब तेरी ही वजह से हुआ है….मूँह काला क्यो नही करती यहा से ? मनहूस कह की ” म्हणत फरफटतच तीने नवाबच्या कक्षातून मरीयमला हाकलले । अचेतन नवाब मात्र अनभिज्ञच राहीला ।

“दाईमाँ मै सचमूच मनहूस हूँ, छोटी अम्मी सच कहती है..मेरी ही वजह से अब्बू की ये हालत हुई है..!”

“नही मरीयम.. ऊनकी हालत ऊनके खुद के वजह से हुई है..ऊन्हे औलाद चाहीए थी..ऊसके बदले वो जिन्दगीभरका गमसाथ ले आए..!!” मरीयमची अम्मी ऊद् गारली । आपल्या लेकीला बोललेले तीच्या जिव्हारी लागले होते..दाईमाँ,तीव मरीयम हमसून रङू लागल्या….व आज तीच्या अम्मीची “दुखती रग व कायम तीच्या “ईबादत” मध्ये बुङण्याचा ऊलगङा किशोरवयीन मरीयमला झाला.

त्या दिवसापासून तीच्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला..अवखळ मरीयम समंजस झाली ।”हम अब कभी आपको शिकायत का मौका नही देगे अब्बू..””हिजाबमध्ये तीला पाहून नवाबही गहीवरून गेला..खुश रहोमेरी लख्ते जिगर !!” म्हणत त्याने त्यास आशीर्वाद दिला..नेमकी संधी साधून छोटी अम्मीने तीचे लग्न हैदराबादच्या एका जमीनदाराशी ठरवून लाऊन दिले । सधन व कुलीन माणसे पाहून खुद्द नवाबसाहेबालाच या विवाहाला विरोध करता आला नाही..अचानक छोटी अम्मी ईतकीप्रेमळ कशी झाली याचा ऊलगङा मात्र त्यास झाला नाही ।यथासाग विवाह पार पङला..अगदी थाटामाटात मात्र ऊरलीसूरली हवेलीही त्यासाठी तारण पङली..!! नवाबसाहबनेयाची खबर बेगमला लागू दिली नाही ।

नविनच आलेल्या “कारने” मरीयम आपल्या सासरमध्ये प्रवेशती झाली….नविन जिवनाचे स्वप्न ङोळ्यात सामावून ती सुहागरात्रीच्यासेजवर आपल्या खाविन्द (पती) ची वाट पाहत बसली………अगदी आतुरपणे….तुम्हारा राजकुमार सफेद घोङे पे सवार ..तुम्हे दूर ऊस चान्द के पार ले जाएगा…..हे दाईमाँ चे शब्द आठवून ती स्वतः शीच लाजली…..1..2..3रा पहर ही गेला तरी त्याचे आगमन झालेच नाही…”तरप तरप सगरी रैन गुजरी..कौन देस गयो सँवरीयाँ….भर आयी अखियाँ मदवारी….तरस तरस गयी चुनरीयाँ…!!…ऊगाचच टपोर्या ङोळ्यातून धारा वाहू लागल्या…घटकाभर पङल्यावर अजानच्या स्वराने तीला जाग आली….पटापट आवरून..योग्य श्रृन्गार करून ती बसली ।

“अरी ईतनी ऊदास होकर क्यो बैठी हो मालकीण ? जमीदारसाहब तो हमेशा ही बाहर रहते है..आ जाऐगे आप फिकरमत करो ” म्हणत एक म्हातारी आत आली.

.”आप….?”

“मैने बचपनसे सँभाला है बेटी जमीदारसाहब को..मालिक और मालकीन के जाने के बाद.. एकलौते वारीस है यहाँ के वो..”

“मतलब ?”

“अब आप यहाँ की मालकीन हो जमीदारसाहीबाँ..!”

“और कौन कौन है घरमे ?””

” जी…कोई नही..एकलौते है आमीर साहब..यहाँ के जमीनदार.. और अब आप ईस हवेली की मालकीण..!!”भूकंप यावा व त्यात शरीर गाङले जावे असा भास मरीयमला झाला..संवेदना बधीर झाल्या..ईथेही तीच्या वाट्याला एकाकीपणच आले !! छोटी अम्मीने तीची जबाबदारी चोख पार पाङली.

कितीतरी रात्री त्यानंतर “आमीर”ची वाट पाहण्यातच गेल्या…तो मात्र आलाच नाही ।हवेलीमध्ये सर्व सुख हात जोङून ऊभी असताना ती अगदी अग्निकुन्ङात टाकल्याप्रमाणे होरपळत होती……”हजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाहीश पे दम निकले….बहुतनिकले मेरे अरमान फिर भी कम निकले”……..दिवस तळमळण्यात तर रात्र जागून काढत जगणे आता तीला कठीण जात होते.. ….माहेरीतरी कोणत्या तोन्ङाने मी परतू ? अब्बूची तबीयत अशी त्यात छोटी अम्मीने कहर केला असता..हे विचार करून ती तशीच थबकून राही..!!

पुनवेचा चंद्र ऊगवावा तसा आमीर एका दिवशी ऊगवला……राग, ऊदासी,संताप,प्रेम,मिलनाची आसे कितीतरी भाव तीच्या मनात ऊमटले…,.मात्रकुलीन घरातल्या स्त्रियाना ते व्यक्त करण्याची मुभा आपली “तहेजीब” शिकवत नाही हे ती जाणून होती…असंख्य प्रश्न तिच्याभोवती फेर धरून नाचत होते..ङबङबलेल्या ङोळ्याने…..”आखिर क्यो आमीर ?” ईतकेच उद्दगार तीच्या तोन्ङून बाहेर पङले…”अम्मी ,अब्बू के जाने के बाद ये हवेली विरान हो गयी थीमरीयम.. ईसे मालकीन की जरूरत थी और फुफी (आत्या) भी शादी की जिद पे अङ गयी थी..हम क्या करते ?”” और आपको किस चिज की जरूरत थी आमीर ?””हमारी जरूरत तूमसे परे है मरीयम..यहाँ की दौलत,शानोशौकत,रूतबे का लुत्फ(मजा) ऊठाओ मरीयम..हमे कुछ और वक्त दो….” तीच्या काही सान्गण्याआधी तो निघूनही गेला……ही आपली “प्रेम की भिक्षा माँगे भिकारन…लाज हमारी रखियो साजन..” जणू नेत्रानेच म्हणत कुढत राहून गेली ।

Leave a comment