फोटो

By Bhampak Entertainment Articles Laxman Asbe 2 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

फोटो –

व्हाट्सअपवरती मोठ्या नेत्यांसोबत टाकलेले फोटो पाहिले की प्रश्न पडतो, या माणसाचा नेमका उद्देश काय⁉️ त्या नेत्याची आणि यांची पूरती ओळखही नसते, मग या फोटो मागचा उद्देश फक्त एकच उरतो, तो म्हणजे, मला मोठे म्हणा किंवा समजा.

जो अतिशय छोटा असतो, तोच अशी मोठेपणाची भीक मागत असतो. जो मूळचा मोठा आहे तो त्याच्या नम्रतेने आणि अहंकार विरहीत आपुलकीने सूर्यासारखा तळपत असतो. सूर्याला जसे आपले तेज दाखवण्यासाठी काहीच करावे लागत नाही, तो स्वयंसिद्ध आहे, तसे मोठ्या माणसाला मोठेपण दाखवण्याचा आटापिटा करावा लागत नाही. त्यांचे मोठेपण स्वयंसिद्ध असते.

जो स्वतःला मोठा आहे असे मानतो, तो अतिशय छोटा असतो आणि जो स्वतःला मी छोटा आहे असे मानतो, तो अतिशय मोठा असतो कारण मोठेपणाचा अहंकार नष्ट करण्यासाठी असामान्य धैर्याची आणि सहनशीलतेची कसोटी लागत असते. ही कसोटी त्या व्यक्तीने पार केलेली असते.

आपला फोटो ज्यांच्या सोबत असतो , त्यावरून आपली आवड आणि आदर्श कळतात. आपले फोटोजर संत , सद्गुरू, समाजसेवक, समाजसुधारक,महामानव,शूर आणि वीर पुरुषांच्या किंवा वीरांगनांच्या चरणाजवळ असेल तर आपली उंची आणि मोठेपणा अधोरेखित झाल्याशिवाय रहात नाही.

दुसऱ्याच्या फोटो सोबत आपली किंमत मोठी ठरविण्यापेक्षा आणि करण्यापेक्षा आपल्या आचरणातून ती सिद्ध करण्यात खरा पुरुषार्थ आहे.दुसऱ्याच्या फोटोसोबत आपली किंमत मोठी ठरविण्यापेक्षा आणि करण्यापेक्षा आपल्या आचरणातून ती सिद्ध करण्यात खरा पुरुषार्थ आहे.

डॉ. आसबे  ल. म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार

Leave a comment