विठ्ठल मूर्ती, दिवे घाट –
पुण्यातील दिवे घाटात विठुरायाची ही ६० फुटी भव्य मूर्ती साकारण्यात आली आहेपाया १५ फूट व ४५ फूट मूर्ती अशी एकूण ६० फुट उंच मूर्ती लक्ष वेधून घेते. मूर्ती साकारताना सिमेंट व विशेष धातू वापरून करण्यात आली आहे.विठ्ठल मूर्ती, दिवे घाट.पुण्यात प्रवेश करण्यासाठी प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला एक घाट म्हणजे दिवे घाट.
शिवपूर्वकालीन पुणे विजापूर महामार्ग याच घाटातुन जात असे त्यामुळे हा एक महत्वाचा व्यापारी मार्ग म्हणूनही प्रचलीत होता. मराठेशाहीच्या इतिहासात या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगड या छोटेखानी किल्ल्याची निर्मिती केली गेली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरला याच घाटातून जाते. त्यामुळे या घाटाला अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे.
सध्याच्या काळात हा प्रशस्त मार्ग दिसत असला तरी याचे प्राचीन महत्त्व खूप आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून हा मस्तानी तलाव बांधला. पालखी जेव्हा या घाटातून जाते तेव्हा एक विहंगमय दृश्य आपल्याला पाहायला मिळते.
भौगोलिक स्थान (Location) –
हडपसर येथील रहिवासी विजय कोल्हापुरे यांनी दिवे घाट संपताना डावीकडे असलेल्या हॉटेल परिसरातील जागेवर विठ्ठलाची भव्य मूर्ती उभी केली आहे. सागर भावसार यांनी ही मूर्ती घडविली आहे.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
पुण्यातील दिवे घाटात विठुरायाची ही ६० फुटी भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. पाया १५ फूट व ४५ फूट मूर्ती अशी एकूण ६० फुट उंच मूर्ती लक्ष वेधून घेते. मूर्ती साकारताना सिमेंट व विशेष धातू वापरून करण्यात आली आहे.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
दिवे घाटमोरगाव हे पुण्यापासून सुमारे ३० कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी अथवा बस ने आपण जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
हडपसर अथवा सासवड परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
विठ्ठल मूर्ती, दिवे घाट परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
परिसरात आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
इतिहास (History) –
हडपसर येथील रहिवासी विजय कोल्हापुरे यांनी दिवे घाट संपताना डावीकडे असलेल्या हॉटेल परिसरातील जागेवर विठ्ठलाची भव्य मूर्ती उभी केली आहे. सागर भावसार यांनी ही मूर्ती घडविली आहे.
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
मल्हारगड, मस्तानी तलाव, सरदार पानसे वाडा, सासवड